Elec-widget

शिवसेनेला आणखी एक धक्का, निर्णयावर 17 आमदार नाराज?

शिवसेनेला आणखी एक धक्का, निर्णयावर 17 आमदार नाराज?

शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

अभिषेक पांडे, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असताना शिवसेनेची कोंडी झाली आहे. आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपविरुद्ध निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केली आहे. मात्र शिवसेनेतील 17 आमदार पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.

नाराज आमदार पश्चिम महाराष्ट्रातील?

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आमदारांनी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

Loading...

एकीकडे शिवसेनेतील काही आमदार नाराज असल्याची चर्चा असताना सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीनंतर बैठकांना पूर्णविराम मिळेल आणि येत्या 4 ते पाच दिवसांमध्ये राज्यात महाशिवआघाडीचं लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात काल चर्चा झाली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. 'काँग्रेसमध्ये निर्णयाची एक प्रक्रिया आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार बनेल. डिसेंबरपर्यंत राज्यात मजबूत सरकार येईल. येत्या पाचसहा दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. आम्ही बहुमताचा आकडा राज्यपालांकडे घेऊन गेल्यावर आम्हाला राज्यस्थापनेची परवानगी मिळेल,' असं म्हणत संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबद्दल माहिती दिली आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 20, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...