मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राहुल शेवाळेंचा दिल्लीत 'युती'चा बॉम्ब, हादरे मात्र राज्यातल्या 'महाविकासआघाडी'ला!

राहुल शेवाळेंचा दिल्लीत 'युती'चा बॉम्ब, हादरे मात्र राज्यातल्या 'महाविकासआघाडी'ला!

एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मुंबईपाठोपाठ दिल्लीमध्येही शिवसेनेला (Shivsena) धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी (Shivsena MPs) एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 19 जुलै : एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मुंबईपाठोपाठ दिल्लीमध्येही शिवसेनेला (Shivsena) धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी (Shivsena MPs) एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी या खासदारांसोबत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन शक्तीप्रदर्शन केलं. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळे (Rahul Shewale) शिवसेनेचे गटनेते तर भावना गवळी (Bhavana Gawali) प्रतोद असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. याच पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटचे हादरे राज्यातल्या महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi) बसण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घ्यायला आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाणही (Ashok Chavan) होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची वेगळी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं, याचा बॉम्ब राहुल शेवाळे यांनी फोडला आहे.

'जून महिन्यात उद्धव ठाकरेंनी मोदींची भेट घेतली तेव्हा पुन्हा युती करण्याबाबत चर्चा झाली. पण जुलै महिन्यात राज्यातल्या भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली, त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले,' असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. यानंतर आपण उद्धव ठाकरेंना भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सांगितलं. तेव्हा माझे प्रयत्न करून झाले, आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं, यानंतर महाविकासआघाडी अस्तित्वात राहणार का नाही? याबाबत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्षांमधल्या काही नेत्यांची आगामी निवडणुका एकत्रच लढण्याची भूमिका आहे, पण राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण होणार का आणि याचा परिणाम महाविकासआघाडीच्या भवितव्यावर होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

First published:

Tags: BJP, PM narendra modi, Shivsena, Uddhav thackeray