मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाच्या आव्हानानंतर ठाकरे समर्थक बॅकफूटवर? दसरा मेळाव्याबाबत म्हणाले...

शिंदे गटाच्या आव्हानानंतर ठाकरे समर्थक बॅकफूटवर? दसरा मेळाव्याबाबत म्हणाले...

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमधलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 सप्टेंबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमधलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या दसरा मेळाव्याआधी दोन्ही गटांकडून एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत.

दसरा मेळाव्याला ज्यांची गर्दी जास्त, त्यांचीच खरी शिवसेना असं आव्हान शिंदे समर्थक रामदास कदम यांनी केलं होतं. रामदास कदम यांच्या या आव्हानानंतर ठाकरे समर्थकांनी काहीशी माघार घेतल्याचं चित्र आहे. शिवाजी पार्कचा दसरा मेळावा इव्हेंट नसून तो विचारांचा मेळावा असल्याचं अनिल परब म्हणाले आहेत. अनिल परब यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे समर्थकांची भूमिका नमती झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा टिझर आणि पोस्टर समोर आलं आहे. दसरा मेळाव्याच्या या टिझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला आहे.

एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर

दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर जवळपास अडीच ते तीन लाख लोक येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक करण्यात आली आहेत. 'दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray