बीड, 13 मे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) राज्यामध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सरकारनं 1 जूनपर्यंत वाढ केली आहे. मात्र यावरून आता सरकारवर (Maharashtra Government) टीका आणि आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. शिवसंग्रामचे (Shivsangram) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीही सरकारवर यावरून गंभीर आरोप केला आहे. मराठा (Maratha Community) समाजाचं मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
(वाचा-महाराष्ट्रातील फक्त एक जिल्हा; राज्यासह केंद्रालाही देतोय कोरोनाचा 'ताप')
मराठा समाजाच आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. मराठा समाजातील तरुण, नागरिकांचा हा असंतोष समोर येऊ नये, किंवा मराठा समाजाने मोर्चे आंदोलन करू नये, रस्त्यावर उतरू नये, कोणतीही ठाम भूमिका घेऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने आणि उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक लॉकडाऊन लावला असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या मनामध्ये पाप असल्याची टीकाही विनायक मेटे यांनी केली आहे.
(वाचा-Corona Vaccination सोलापूरच्या केंद्राचा आदर्श, डोस वाया जाण्याचे प्रमाण 0 %)
राज्यातही एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वसामन्यांच्या उदरनिर्वाहाचा किंवा रोजीरोटीचा कुठलाही विचार न करता सरकारनं लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. त्यामुळं हा लॉकडाऊन अन्याय करणारा असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवरील निर्णयात सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. मराठा समाजातील काही नेत्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तीव्र होण्याची शक्यता होती. पण सरकारनं लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला आहे. त्यामुळं अशाप्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. पण लॉकडाऊन संपल्यानंतर कशा पद्धतीने हा संपूर्ण विषय पुढं जाणार हे पाहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Maratha reservation, Vinayak mete