मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हिंदू हृदयसम्राट यांचे चिरंजीव सत्तेत आसताना साधू, संत, कीर्तनकारांवर अन्याय'

'हिंदू हृदयसम्राट यांचे चिरंजीव सत्तेत आसताना साधू, संत, कीर्तनकारांवर अन्याय'

 इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.

इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.

इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.

  • Published by:  Sandip Parolekar

नाशिक, 19 जुलै: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे सत्तेत आसताना राज्यातील साधू, संत आणि कीर्तनकार यांच्यावर अन्याय होत आहे, अशा शब्दात शिवसंग्राम पक्षाचे नेते  विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केली आहे. इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.

हेही वाचा...काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांची राम मंदिर भूमीपूजनावर टीका

मराठा आरक्षणाबाबत फक्त एकनाथ शिंदें हेच चांगली भूमिका मांडत आहे. बाकी मुख्यमंत्रीसह सर्वच मंत्री दुर्लक्ष करत आहेत. राममंदिर बनत आहे ही चांगली बाब आहे, सर्व हिंदू ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस लवकरच येणार आहे. असंही मेटे म्हणाले.

सरपंच नियुक्तीचे अधिकार पाकमंत्र्यांना दिले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप देखील आहे.

दूध पिशव्या देऊन आंदोलन करणार

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने महायुतिच्या वतीने उद्यापासून राज्यात आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दूध उत्पादकांना 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्यावं, ही प्रमुख मागणी असणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.

हेही वाचा..कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी

दरम्यान, या सरकारच्या काळात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालये सरकारने ताब्यात घ्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली. सरकारने चाचण्या कमी केल्या, रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

First published:

Tags: Udhav thackeray, Vinayak mete