मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र; ठाकरेंना म्हणाला, "हे ही दिवस निघून जातील, पुढचा काळ..."

शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र; ठाकरेंना म्हणाला, "हे ही दिवस निघून जातील, पुढचा काळ..."

कार्यकर्त्याने लिहिलेले पत्र

कार्यकर्त्याने लिहिलेले पत्र

शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंबाबत आजही एक सहानुभूती निर्माण झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana (Buldhana), India

राहुल खंडारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 3 फेब्रुवारी : गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या राजकारण मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यातील सर्वात प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केला. तसेच भाजपसोबत सरकार स्थापन केले. मात्र, यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंबाबत एक सहानुभूती निर्माण झाली आहे. अनेक जण आजही त्यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत.

यातच आता बुलडाणा जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकाने रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. सच्चा शिवसैनिक या भावनेतून त्याने उद्धव ठाकरेंना हे भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये "हे ही दिवस निघून जातील, पुढचा काळ शिवसेनेचाच" असे त्याने या पत्रात लिहिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात आपल्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना आपल्या रक्ताने भावनिक पत्र लिहिले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील श्रीराम खेलदार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना आपल्या रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशा घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशा घोषणाही देण्यात आल्या.

अन् तिथेच उद्धव ठाकरे चुकले, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसैनिक श्रीराम खेलदार काय म्हणाले ?

"हेही दिवस निघून जातील आणि पुढचा काळ हा शिवसेनेचा असेल.. मरेपर्यंत आपण उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहणार असून आपली निष्ठा ही ठाकरेंच्या मातोश्रीसोबत आहे. त्याचबरोबर आपण कदापी गद्दार होणार नाही" असा संदेश निष्ठावान शिवसैनिक श्रीराम खेलदार यांनी आपल्या रक्ताने लिहिला आहे. लवकरच उद्धव ठाकरेंची आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष भेट घेऊन हे पत्र उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करणार असल्याची माहिती खुद्द शिवसैनिक असलेल्या श्रीराम खेलदार यांनी दिली आहे.

First published:

Tags: Buldhana, Maharashtra politics, Shivsena, Uddhav Thackeray