किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या 348 व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होन च्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. या सुवर्ण होन 350 वर्षांपूर्वीच्या आहेत. ज्या स्वराज्यातील एका शिलेदारांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या. या सुवर्ण होन आतापर्यंतचा सापडलेला सर्वात महत्त्वाचा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.शिवराज्याभिषेक दिनाच्या पुर्वसंधेला दुर्गराज रायगड ऐतिहासिक वास्तूंना साजेश्या पध्दतीने आकर्षक विद्यूतरोषणाई करण्यात आली.#६जून#शिवराज्याभिषेक_सोहळा pic.twitter.com/Lqt0qRb620
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
Shivrajyabhishek: रायगडाच्या पायथ्याला पोलीस छावणीचे स्वरूप; संभाजीराजे मोठी घोषणा करणार? कोविड 19 संसर्गामुळे सलग दुसऱ्यावर्षी किल्ले रायगडावर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. पहाटेच्या सुमारास राज सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील मूर्तीस फुलांनी सजवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता स्वराज्याचे निशाण भगवा ध्वजपूजन करण्यात येईल. त्यानंतर रेकाँर्डेड शाहिरी कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येणार आहे. मग मुख्य सोहळा किल्ले रायगडावरील राज सदरेत सुरू होईल. सकाळी 8.30 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांचे राज सदरेत आगमन होईल.VIDEO: शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी विद्युत रोषणाईने उजळला रायगड किल्ला#६जून #शिवराज्याभिषेक_सोहळा pic.twitter.com/64CG9bnihJ
— News18Lokmat (@News18lokmat) June 5, 2021
शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरवात होईल. यावेळी मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मानचा मुजरा करण्यात येईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मूर्तीस राज्याभिषेक करण्यात येईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक राज सदरेतून, नगारखाना, होळीचा माळ, मुख्य सचिवालय (बाजारपेठ) या मार्गाने जगदिश्वर मंदिराकडे निघणार आहे. जगदिश्वर मंदिरात दर्शन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार आर्पण करुन या शिवराज्यभिषेक सोहळ्याची सांगता होणार आहे.आई शिरकाई गोंधळ..!!#शिवराज्याभिषेक_सोहळा #६जून pic.twitter.com/zeCUZCmKZg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati shivaji maharaj, Raigad, Sambhajiraje chhatrapati