मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर, 'शिवनेरी'च्या दरात मोठी कपात

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर, 'शिवनेरी'च्या दरात मोठी कपात

कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून म्हणजेच 8 जुलै पासून लागू होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याबाबत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून म्हणजेच 8 जुलै पासून लागू होणार आहेत.

एसटी महामंडळाने या बसेसच्या तिकीट दरात घट केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवासी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल, या हेतून दरकपात करण्यात आली आहे .

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना मुंबई-पुणे मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दरकपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार पासून कमी झालेले नवीन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

मेस्सी आणि रोनाल्डोलाही 'टफ फाईट' फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा VIDEO व्हायरल

First published: July 3, 2019, 3:37 PM IST

ताज्या बातम्या