बारामती, 24 जानेवारी : भाजपमधील (BJP) अनेक आमदार राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra raje Bhosle) यांनी बारामतीमध्ये (Baramati) जाऊन राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. शिवेंद्रराजे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात बारामतीतील 51 च्या 51 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. ग्राम पंचायत निकालानंतरचा अजित पवारांचा हा पहिलाच बारामतीचा दौरा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.
निवडणूक आयोगाची मतदारांसाठी मोठी घोषणा; वोटर्स डेला लाँच होणार डिजिटल वोटर कार्ड
यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही. विशेष म्हणजे, शिवेंद्रराजे भोसले यांनी याआधी सुद्धा अजित पवार यांनी अनेक विकासकामांच्या निमित्ताने भेटी घेतल्या आहे.
एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याच्यावेळी सुद्धा शिवेंद्रराजे हे बैठकीसाठी हजर होते. शिवेंद्रराजे यांची राष्ट्रवादी पक्षासोबत जवळीक वाढत असल्यामुळे साताऱ्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळत आहे.
धक्कादायक! जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं, पाच जणांना अटक
मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर अनेक भाजपचे आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. आज पुन्हा एकदा शिवेंद्रराजे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.