Home /News /maharashtra /

अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

सातारा, 17 डिसेंबर : भाजपमधील (BJP) काही नेते संपर्कात  असं राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितल्यामुळे मेगाभरतीची चर्चा रंगली आहे. आज साताऱ्याचे भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhosale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, बुधवारीच शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. आज भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी साताऱ्याच्या विविध विकासकामाबाबत पाठपुरवा केला आहे. बुधवारी  शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मेडिकल कॉलेजसाठी निधीची मागणी केली होती. पुणे हादरलं! मावस बहिणींचं अपहरण करून दोन नराधमांकडून लैंगिक अत्याचार आमदार शिवेंद्रराजेंच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्र्यांनी आणखी 61 कोटींची तरतूद केली. जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश आले आहे. नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 61 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. शरद पवार यांची साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची बैठक दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) थेट आज साताऱ्यात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शरद पवार आणि रयतचे पदाधिकारी यांच्यात काय चर्चा होणार, त्याचबरोबर शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Satara, Sharad pawar, शिवेंद्रराजे भोसले

पुढील बातम्या