मुलं आता महाराजांची युद्धनीती शिकणार, देशातील या विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरू चा समावेश

मुलं आता महाराजांची युद्धनीती शिकणार, देशातील या विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरू चा समावेश

'शिवाजी द मॅनेजमेंट गुरू' हा अभ्यासक्रम तयार करणारे देशातील एकमेव विद्यापीठ

  • Share this:

कोल्हापूर, 04 मार्च : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून "छत्रपती शिवाजी द मॅनेजमेंट गुरु" हा विषय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम तयार करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, गनिमा कावा, युद्धनिती यांचा अभ्यास विद्य़ार्थ्यांना करता येणार आहे.

शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा, जाज्वल्य इतिहासाचा अभ्यास करता यावा यासाठी हा विषय तयार करण्यात येणार आहे. मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी 50 गुणांचा हा पेपर असून दहा गुण प्रात्यक्षिकासाठी असणार आहेत. याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर लवकरच हा अभ्यासक्रम सूचना आणि हरकती साठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

VIDEO: 30 फुटी 'बाहुबली' शिवलिंग पाहिलं का तुम्ही?

First published: March 4, 2019, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading