सातवीच्या पुस्तकात गंभीर चुका.. शिवाजी महाराजांच्या नावाचं स्पेलिंगही चुकवलं

सातवीच्या पुस्तकात गंभीर चुका.. शिवाजी महाराजांच्या नावाचं स्पेलिंगही चुकवलं

सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सातवीतल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये गंभीर चुका आहेत. धक्कादायक म्हणजे पुस्तकातल्या चूका समोर आणणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी फीचे कारण पुढे करून हाकलून दिल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

नितीन बनसोडे (प्रतिनिधी),

लातुर, 6 ऑगस्ट- सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सातवीतल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये गंभीर चुका आहेत. धक्कादायक म्हणजे पुस्तकातल्या चूका समोर आणणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी फीचे कारण पुढे करून हाकलून दिल्याचे समोर आले आहे.

राज्यभरात असलेल्या 'झी' या सीबीएससी पॅटर्नच्या इंग्रजी माध्यमाची शाळा लातुरात देखील आहे. माऊंट लिटरा झी स्कूल या नावानं चालणाऱ्या या शाळेत इयत्ता सातवीच्या सोशल सायन्स या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्याची निदर्शनास आणून देणाऱ्या विध्यार्थीनीलाच फीचे कारण सांगत वर्गाबाहेर काढल्याचा आरोप स्वतः विद्यार्थिनीने केलाय.

सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनीचे नाव समृद्धी करपे असे आहे. समृद्धीनं सोशल सायन्सच्या पुस्तकातील शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले यांच्या नावात झालेल्या चुकीबद्दल शिक्षकांना सांगितलं. मात्र, शिक्षकांनी पुस्तकातलंच खरं असं सांगत आणि शाळेची फीस न भरल्याचं कारण पुढं करत परीक्षेतून हाकलून दिल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केलाय. याशिवाय या शाळेत भरमसाठ फीस तर घेतलीच जाते त्याव्यतिरिक्त पुस्तकं आणि ड्रेससहित सर्व साहित्य शाळेतूनच घ्यावं लागतं, अशी सक्ती देखील असल्याचं समृद्धी हिने सांगितलं.

याबाबत शाळा प्रशासनाला विचारलं असता पुस्तकात झालेली स्पेलिंगची चूक शाळेचे प्रिन्सिपल बिन्यू जेकब यांनी मान्य केलीय. मात्र, विद्यार्थिनीने वर्गाबाहेर हाकलून दिल्याच्या आरोपाचं शाळेनं खंडन केलंय. याशिवाय शिक्षकांच्या पेमेंटसाठी विध्यार्थ्यांना फीसची सक्ती करावी लागत असल्याचं देखील सांगण्यात आलंय . लातूर शहरतल्या एका विद्यार्थिनीने पुस्तकातली ही चूक निदर्शनास आणून दिलीय. मात्र, राज्यभरात या शिक्षण संस्थेचं जाळं असल्यानं राज्यभरातल्या विधायर्थ्याना महामानवांबद्दल चुकीचं स्पेलिंग शिकवलं गेलंय कि काय अशी शंका निर्माण झालीय!

...अन्यथा तलवारींचा वापर करा, शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना अध्यक्षांचं चिथावणीखोर भाषण VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading