शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप, नितेश राणेंची TV चॅनलला धमकी

शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप, नितेश राणेंची TV चॅनलला धमकी

सोशल मीडियावर या मुद्द्यावरून अमिताभ बच्चन यांना टार्गेट करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : बॉलिवडूचे महानायक अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालक असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर या मुद्द्यावरून अमिताभ बच्चन यांना टार्गेट करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ज्या 'सोनी' वाहिनीवर 'केबीसी' हा कार्यक्रम प्रसारित होतो त्या वाहिनीला थेट धमकी दिली आहे.

'आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन @sonykbc10 नी त्यांचा अपमान केला आहे. याप्रकरणी लवकर माफी मागा नाहीतर या 'शो'ची एक पण लाईफलाइन राहणार नाही,' असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे 'सोनी' वाहिनी याप्रकरणी माफी मागणार का, हे पाहावं लागेल.

काय आहे प्रकरण?

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

कौन बनेका करोडपती हा शो ताज्या सीझनमध्ये लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गुजरातच्या स्पर्धक शाहेदा चंद्रन अमिताभ यांच्यासमोर होत्या.'कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न शाहेदा यांना विचारण्यात आला. यासाठी चार पर्याय देण्यात आले.

1. महाराणा प्रताप

2. राणा सांगा

3. महाराजा रणजीत सिंह

4. शिवाजी

छत्रपतींचा उल्लेख फक्त शिवाजी असा करण्यात आल्याने महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर त्याचे पडसाद दिसत आहेत.

औरंगजेबाचा उल्लेख सम्राट असा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मात्र एकेरी उल्लेख झाल्याने नाराजी जास्त आहे. त्यामुळे KBC मध्ये नवा वाद ओढवण्याची शक्यता आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

First published: November 8, 2019, 9:28 AM IST

ताज्या बातम्या