• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच, संजय राऊतांच मोठं विधान

दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच, संजय राऊतांच मोठं विधान

राज्यात कोरोनाचा कहर असताना अनेक सण आणि उत्सवांवर बंधनं घालण्यात आली.

  • Share this:
मुंबई, 17 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाचा कहर असताना अनेक सण आणि उत्सवांवर बंधनं घालण्यात आली. लोकांची गर्दी होऊ नये, याची प्रशासनाकडून खबरदारीही घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणजे, दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दसरा मेळावा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण व्यासपीठावरूनच होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दसरा मेळाव्याचं महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल, अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. हेही वाचा..देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा राज्य सरकारचा डाव, भाजप नेता आक्रमक नरेंद्र मोदींना चिमटा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार निवडणुकांसाठी 12 सभा नियोजित आहेत. या सभा कशा पद्धतीनं होणार हे बघितलं पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टोला लगावला. कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच... कंगना रणौतबाबत कोर्टानं दिलेल्याआदेशानुसार कार्यवाही होईल. कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच, मात्र आपल्याकडे यबाबत अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 'कलाकार कलाकर असतो...तो हिंदु-मुस्लिम कलाकार नसतो', असं ते म्हणाले. दरम्यान, शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत असते. यंदा ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विचार होता. पण यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा...एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप करणारा 'तो' इथिकल हॅकर पुन्हा आला चर्चेत मात्र, दसरा मेळाव्याला लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर गोळा होतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजिटल व्यासपीठावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचा पर्याय खुला आहे. यासाठी लवकरच पक्षातील नेते एकत्र येऊन चर्चा करतील. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असेही संजय राऊत म्हणाले.
Published by:Sandip Parolekar
First published: