छत्रपती शिवाजी महाराजांचा अहोरात्र जप करणाऱ्या शिवसेनेने या महागड्या विजबिलांबाबत अत्यंत दुटप्पी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केली आहे, अशी घणाघाती टीका आपनं शिवसेनेसह राज्य सरकारवर केली आहे. राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी सरकारप्रमाणेच राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत वीज माफी देत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे. ऊर्जामंत्री म्हणाले, 100 युनिट वीज माफीचा शब्द पाळणार; पण... लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलातून 100 युनिटपर्यंत वीज माफ करणार, असा मी शब्द दिला होता. राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. मागील भाजप सरकारनं केलेल्या थकबाकीच्या पापाचं काय? असा सवाल देखील ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित केला. वीज बिल माफ करण्यासाठी समिती देखील गठीत केली. पण कोरोना काळात बैठका होऊ शकले नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी स्पष्ट केलं. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना सांगितलं की, 100 युनिट वीज माफ यासाठी भूमिका आज बदललेली नाही. भाजप नेत्यांनी वाढीव वीजबिल घेऊन माझ्या कार्यालयात यावे, मी चर्चा करायला तयार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. पण मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. असं काम सुरू आहे, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भाजपवर जोरदार हल्लाबोल... वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती पत्रकारांना देतानाच नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महावितरण कंपनीची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. माजी ऊर्जामंत्र्यांनी चांगलं काम केलं, असा भाजपकडून दावा केला जात आहे. पण आकडेवारी मात्र वेगळेच सांगत आहे, असा टोला नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. हेही वाचा..राजधानीत कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबई रेल्वे व विमान सेवा बंद होणार का? काय आहे सत्य दरम्यान, याच मुद्द्यावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.शिवसेनेच्या वचननाम्याची होळी... पाहा संपूर्ण व्हिडीओ@CMOMaharashtra @ShivSena @rautsanjay61 pic.twitter.com/ftVpVZBR3q
— News18Lokmat (@News18lokmat) November 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Maharashtra, Nagpur