Home /News /maharashtra /

शिवसेनेचा बंडखोरीचा इतिहास! आधी भुजबळ, नंतर राणे आता एकनाथ शिंदे? काय आहेत कारण?

शिवसेनेचा बंडखोरीचा इतिहास! आधी भुजबळ, नंतर राणे आता एकनाथ शिंदे? काय आहेत कारण?

मंत्री एकनाथ शिंदे नाराज आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गुजरात (who is shivsena leader eknath shinde ) येथील सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पण, शिवसेनेत अशी बंडखोरी करणारे शिंदे काही पहिलेच नेते नाहीत याआधाही अशा दोन मोठ्या घटना घडल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील सरकारलाही बसू शकतो. दरम्यान, शिवसेना पक्षात असं बंड पुकारण्याची ही काही पहिली वेळ नाही. 1991 साली शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' करण्याची धमक दाखवून छगन भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली होती. तर 2005 मध्ये नारायण राणे यांनी देखील 10 आमदारांसह शिवसेना सोडली होती. आता एकनाथ शिंदे देखील त्याच मार्गावर दिसत आहेत. मात्र, भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची तादक जास्त समजली जाते. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असेल. 25 वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत ते बंडखोर.. भुजबळ यांनी सेना का सोडली? तब्बल 25 वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून काम केल्यानंतर भुजबळांनी शिवसेना का सोडली होती?, असं काय झालं होतं की त्यांनी थेट 'रिमोट कंट्रोल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंशीच 'पंगा' घेतला होता?, शिवसैनिक राज्यभर शोधत असताना भुजबळ नेमके कुठे लपले होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे, मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ 1985च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर ते हल्लाबोल करत होते. Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट शिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा, अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले. शिवसेना सर्वांत मोठा विरोधी पक्ष होता. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं. त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं, असं मानलं जातं. "त्यावेळी शिवसेना सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती. भुजबळांनी शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यांच्या बंगल्यावर तेव्हा हल्ला करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्नही केला होता," पण, कालांतराने वातावरण निवळलं भुजबळानंतर नारायण राणे.. नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. ते विशीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या काळात तमाम कट्टर शिवसैनिकांपैकीच नारायण राणे एक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. सुरुवातीला ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. 1991 साली छगन भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे महसूल मंत्री झाले. Congress mla Maharashtra : आता काँग्रेसचे 10 आमदार बाहेर पडणार? विजय वडेट्टीवार यांच्या मनात आहे तरी काय? नारायण राणे मुख्यमंत्री युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले. मात्र, याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले. 1999 साली उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावं आम्हाला अंधारात ठेवून परस्पर बदलली असा आरोप नारायण राणे यांनी केला. 2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती. पण त्यावेळेस शिवसेनेचा कोणताही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहीला नाही. या प्रसंगापासून राणे शिवसेनेपासून दुरावण्याचा वेग वाढला. अखेर 2005 मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाराणय राणे यांच्यासोबत त्यावेळी 10 आमदारांनी पक्ष सोडला होता. एकनाथ शिंदे गेले तर मोठं खिंडार.. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासोबत 10 च्या आतच आमदार गेले होते. मात्र, सध्या शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे जिल्ह्यावर शिंदे यांची चांगलीच पकड आहे. शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे खासदार आहेत. त्यामुळे भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी यशस्वी झाली तर शिवसेनेची आतापर्यंतची सर्वात मोठी हानी होईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Chagan bhujbal, Eknath Shinde, Narayan rane

    पुढील बातम्या