मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलं, शिवसैनिकांकडून शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, VIDEO

गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलं, शिवसैनिकांकडून शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, VIDEO

 गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

  • Published by:  sachin Salve
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे. अलीकडे शिंदे सरकारचा विस्तार सुद्धा झाला आहे. पण, शिवसैनिकांमध्ये अजूनही तीव्र संताप कायम आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी जळगावात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे शनिवारी प्रथमच जळगावात आले होते. यावेळी आपल्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं. गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. त्यानंतर धरणगावमध्ये शिवसैनिकांनी याच्या निषेधार्थ महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून पुतळ्यांचे शुद्धीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे जळगावात शिवसेना आणि शिंदे गटात वाद चांगलाच शिगेला पोहोचला आहे. दोन ठिकाणी प्रतिशिवसेना भवन उभारणार -गुलाबराव पाटील दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पाटील यांनी शिवसेना भवन उभारण्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं. 'शिवसेना भवन लवकरच दादर आणि ठाण्यामध्ये उभारण्यात येणार आहे प्रत्येकाच्या असलेल्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणात शिवसेना भवन लवकरच उभे राहणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. 'मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे पण पक्षापेक्षा व्यक्तीलाही मानणारे यात लोक असतात तर काही लोक व्यक्तीला बघूनही मतदान देत असतात पण व्यक्ती जर चांगला आणि समाजाला घेऊन चालणारा असला तर त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही. यामुळेच माणसाने माणसासारखा असला पाहिजे त्या ठिकाणी पक्ष आडवा येता कामा नये जर तुम्ही असे असाल तर निश्चितच तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, असा कानमंत्रच पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
First published:

पुढील बातम्या