कर्नाटकच्या बसेसवर शिवसैनिकांनी लावले जय 'महाराष्ट्र'चे फलक

कर्नाटकच्या बसेसवर शिवसैनिकांनी लावले जय 'महाराष्ट्र'चे फलक

बेळगावसह सीमाभागामध्ये लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी घातल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले आहे.

  • Share this:

23 मे : बेळगावसह सीमाभागामध्ये लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी घातल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले आहे. आज (मंगळवारी) कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं कर्नाटक सरकारचा निषेध करत कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या कर्नाटक राज्याच्या एसटी बसेसवर जय महाराष्ट्रचे फलक लावण्यात आले.

अनेक गाड्यांच्या काचांवर शिवसैनिकांनी हे फलक लावत स्प्रेच्या सहाय्यानंही जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाक राज्याचे मंत्री रोशन बेग यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच याबाबत त्या मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर सेना स्टाईलनं उत्तर देण्याचा इशाराही कोल्हापूर शिवसेनेनं दिलाय.

स्वाभिमान संघटनेनंही लावले जय महाराष्ट्राचे फलक

तर दुसरीकडे  कोल्हापूरमध्येच आज स्वाभिमान संघटनेनंही आंदोलन केलं. कोल्हापूर शहरातल्या शाहू टोल नाक्याजवळ कर्नाटक राज्यांच्या बसेस अडवून त्यांच्यावर जय महाराष्ट्रचे फलक स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लावत बसेसच्या चालक आणि वाहकाला खाली बोलावून त्यांना जय महराष्ट्रच्या घोषणा देण्यास भाग पाडले. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेसोबतच स्वाभिमान संघटनेनंही कर्नाटक राज्य सरकारचा निषेध करत मराठी भाषिकांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 04:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading