शिवसेना कार्यकर्त्यांची मुजोरी, महावितरणच्या कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

शिवसेना कार्यकर्त्यांची मुजोरी, महावितरणच्या कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

नागपुरात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली.

  • Share this:

नागपूर, 15 फेब्रुवारी: नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांची मुजोरी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

नागपुरात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ तारासिंह राठोड यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. नागपुरातील प्रकाशनगर डिप्युटी सिग्नल परिसरात ही घटना घडली.13 फेब्रुवारी रोजी महावितरणचं पथक त्या भागातील थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलं होतं. त्या भागात राहणारे निर्मलकर यांचं 1 वर्षांचे वीजबिल थकीत असल्यानं तारासिंह राठोड यांनी वीज बिल भरण्यास सांगितलं. त्यावेळी दयानंद निर्मलकर यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता राकेश भारतीला घटनास्थळी बोलावलं.शिवसेना लिहिलेल्या गाडीमध्ये आलेल्या राकेश भारती यानं दयानंद निर्मलकरसोबत मिळून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तारासिंह राठोड यांनी केला आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे असा शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी आता शिवसेना कार्यकर्त्यांवर पक्षाकडून दखल घेत कारवाई केली जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तर महावितरणच्या अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीसांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चॉपरने हत्या, फरार आरोपी अखेर अट

हेही वाचा-कोरोनानंतर पुन्हा स्वाइन फ्लूची भीती, पुण्यात आढळले 9 रुग्ण

हेही वाचा-घरातलं लग्न ठरलं शेवटचं! वऱ्हाडी बसची कंटेनरला भीषण धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

First published: February 15, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading