• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अमरावती हादरलं, बारसमोर शिवसेना शहर प्रमुखाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून निर्घृण हत्या, 4 जणांना अटक

अमरावती हादरलं, बारसमोर शिवसेना शहर प्रमुखाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून निर्घृण हत्या, 4 जणांना अटक

अमोल पाटील (amol patil murder) यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • Share this:
अमरावती, 27 जून: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Amravati-Nagpur National Highway) असलेल्या तिवसा (Tiwasa) शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर रात्री 5 जणांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील (Amol Patil murder case) यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तिवसा शहरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाच जणांच्या टोळक्याने अमोल पाटील (वय 34) वर हल्ला केला आणि हत्या केली. अमोल पाटील हा मित्रासोबत बारमध्ये आला होता. पण बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून  5 आरोपींनी अमोल पाटील यांच्या हल्ला चढवला. डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केलं.

Viral Video : चिमुकल्याची कमाल! लगोरी, विटीदांडू ही विसराल, पाहा लहानग्यांचा खेळ

या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस  घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 1 आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे, अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे.

दररोज केवळ एक रुपयाची गुंतवणूक करुन बनवा मोठा फंड

मात्र, राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Published by:sachin Salve
First published: