Home /News /maharashtra /

रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का, नाणार प्रकल्पाला समर्थन करत शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये दाखल

रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का, नाणार प्रकल्पाला समर्थन करत शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये दाखल

शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद पाहायला मिळत होती.

रत्नागिरी, 04 जुलै: रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) नाणार रिफायनरी प्रकल्पावरून (Nanar refinery project) शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये (BJP) जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद पाहायला मिळत होती. त्यामुळे शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. एका गटाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. तर दुसरा गट रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.

'माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी'

याच वादातून रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत समर्थनाची भूमिका घेतलेले शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहे. रिफायनरीला समर्थन केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नाणारचे विभाग प्रमुख राजा काजवे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. तसंच, कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरीनाथ आंर्बेरकर यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

'हा खेळाडूंचा अपमान', टीम मॅनेजमेंटच्या 'त्या' विचारावर कपिल देव नाराज

पंचक्रोशीतले शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आणि सदस्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा पक्षाने शिवसेनेतील नाराज लोकांना एकत्र करून आयती चालून आलेली संधी साधली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तसंच पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रिफायनरी प्रकल्पावरून रंगण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Maharashtra, Mumbai, Ratnagiri

पुढील बातम्या