मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गडचिरोलीत अखेर भगवा फडकला, भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले LIVE VIDEO

गडचिरोलीत अखेर भगवा फडकला, भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले LIVE VIDEO

गडचिरोली अखेर कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजपच्या नगरसेविकेनं बंडखोरी केली.

गडचिरोली अखेर कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजपच्या नगरसेविकेनं बंडखोरी केली.

गडचिरोली अखेर कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजपच्या नगरसेविकेनं बंडखोरी केली.

गडचिरोली, 14 फेब्रुवारी : अलीकडेच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीमध्ये (Gadchiroli ) शिवसेनेनं (shivsena) भगवा फडकावला आहे. पण, कुरखेडामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपचा एक नगरसेवक सेनेत दाखल झाला. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते भिडले. पण, भाजप नगरसेविकेच्या बंडखोरीमुळे सेना आणि काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

गडचिरोली कुरखेडा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वीच शिवसेना भाजप कार्यकर्त्यामध्ये राडा झाला आहे. भाजपचा एक नगरसेवक निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या गोट्यात दाखल झाला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजुला सारले. तणावाच्या वातावरणात निवडणुकीला सुरुवात झाली. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, गडचिरोली अखेर कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजपच्या नगरसेविकेनं  बंडखोरी केली. त्यामुळे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर यांची निवड झाली आहे. कुरखेड्यात भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले होते तर शिवेसेनेचे पाच आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक होते. ऐन निवडणुकीपूर्वीच भाजपच्या जयश्री रासकर यांनी बंडखोरी करुन शिवसेना काँग्रेस युतीच्या गोट्यात प्रवेश करुन शिवसेना-काँग्रेस युतीच्या उमेदवाराला मतदान केल्याने शिवसेनेची कुरखेडा नगरपंचायतीत सत्ता आली आहे.

तर दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.  मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे नगराध्यक्षपदी निवडुन आले आहेत.

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे. शेती, आरोग्य, दळणवळण, वीज पुरवठा, रोजगार या क्षेत्रात शिंदे यांनी जिल्हापातळीवर केलेल्या विकासकामांमुळेच शिवसेनेला हे मोठं यश मिळाले आहे. जिल्हा समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मेहनातीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. 'गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून केलेल्या कामाला जनतेने दिलेली ही पोचपावती असून गडचिरोली जिल्ह्याला मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे' मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

First published: