Home /News /maharashtra /

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची केली धुलाई, LIVE VIDEO

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची केली धुलाई, LIVE VIDEO

काँग्रेसच्या नेत्या शमीम बानो यांच्यावर मुद्रा लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    कल्याण, 25 फेब्रुवारी :  मुंबईजवळील (Mumbai) कल्याणमध्ये (Kalyan) शिवसेनेच्या  (Shivsena) महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका काँग्रेसच्या (Congrss) पदाधिकाऱ्याला भर रस्त्यावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याणमध्ये स्टॅम्प वेंडरचे काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या शमीम बानो यांच्यावर मुद्रा लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेकडो महिलांनी याबद्दल आरोप केला होता. शमीम बानो यांनी अनेक महिलांना मुद्रा लोन देण्याचे आमिष दाखवले होते. बँकेकडून लोन देण्यासाठी बराच विलंब होत होता. तसंच लोन घेण्यासाठी प्रोसेसिंग फिस म्हणून अनेक महिलांकडून पैसे घेतले होते, असा आरोपीही काही महिलांनी केला. याच दरम्यान बुधवारी संध्याकाळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या आशा रसाळ यांच्याकडे या महिलांनी आपली व्यथा मांडली. आशा रसाळ यांनी सर्व महिल्यांची तक्रार जाणून घेतली. त्यानंतर सर्व महिलांना घेऊन थेट शमीम बानो यांचे घर गाठले. त्यावेळी आशा रसाळ आणि शमीम बानो यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शमीम बानो यांना चांगलाच चोप दिला. शमीम बानो यांनी लोकांकडून 15 हजार ते 30 हजारांपर्यंत रक्कम घेतल्याचे बोलले जात आहे. जवळपास दीड हजार लोकांची फसवणूक केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडलेल्या शमीम बानो यांची सुखरुप सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या