मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उस्मानाबादेत शिवसेनेनं राखला गड, महाविकास आघाडीला मोठे यश

उस्मानाबादेत शिवसेनेनं राखला गड, महाविकास आघाडीला मोठे यश

संपूर्ण गावाचे लक्ष लागून असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गोवर्धनवाडी या त्यांच्या मुळगावी 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

संपूर्ण गावाचे लक्ष लागून असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गोवर्धनवाडी या त्यांच्या मुळगावी 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

संपूर्ण गावाचे लक्ष लागून असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गोवर्धनवाडी या त्यांच्या मुळगावी 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

उस्मानाबाद, 18 जानेवारी : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) निकाल आता स्पष्ट होत आहे. उस्मानाबाद (Osmanabad) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. शिवसेना (Shivsena)खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गावात शिवसेनेनं भगवा फडकवला आहे.

संपूर्ण गावाचे लक्ष लागून असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गोवर्धनवाडी या त्यांच्या मुळगावी 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पण 3 जागेवर भाजपचे कमळ फुलले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत ओमराजे यांची सत्ता जरी आली असली तरी महाविकास आघाडी असतानाही भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या गटाने 3 जागांवर विजय मिळवीत ग्रामपंचायत राजकारणात प्रवेश केला आहे.

कै पवनराजे हत्याकांडानंतर गोवर्धनवाडी हे गाव पूर्णपणे ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून गोवर्धनवाडीचा निकाल ओमराजे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय असून त्यांना आता गावातूनच संघर्ष करावा लागत आहे.

तसंच, शिवसेना आमदार कैलास पाटील यांचे मूळगाव असलेल्या कळंब तालुक्यातील देव धानोरा येथे मोठा विजय मिळाला आहे. 9 पैकी 9 जागांवर शिवसेना विजयी झाली आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार पाटील हे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. या गावात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. यात सेनेनं बाजी मारली आहे.

तर पळसप गाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे मूळ गाव आहे. एकूण 13 होत्या. त्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजपात थेट लढत होती. 8 जागा बिनविरोध होत्या. तर 5 जागांसाठी मतदान झाले होते. राष्ट्रवादी 7, सेना 5, अपक्ष 1 विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी विजयी झाला आहे.

अणदूर तुळजापूर तालुक्यातील गाव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे गाव असून चव्हाण यांचे निर्विद वर्चस्व कायम आहे.  एकूण 17 जागांवर निवडणूक झाली. यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. यात 17 पैकी 16 जागा काँग्रेस तर 1 जागेवर भाजप विजयी झाली आहे. त्यामुळे मधुकरराव चव्हाण यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

उस्मानाबाद-मुगाव गावात शिवसेनेच्या 2  गटात लढत होऊन देखील गावावर शिवसेनेनं ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. गावात निवडणूक लढवण्यावरून दोन गटात वाद झाले होते व दोनी गटांनी स्वतंत्र पॅनल उभा केले होते. मुगाव हे शिवसेनेचे भूम परांडाचे आमदार तानाजी सावंत यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे या गावातील निवडणूक चर्चेत आली होती. या गावात जगताप गटाकडे 4 तर गर्दडे गटाकडे 3 जागा आल्या असल्याने ग्रामपंचायतीवर  तानाजी सावंत यांचे वर्चस्व प्राप्त झाले आहे.

माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या आष्टा जहागीर येथील सातपैकी पाच जागेवर यापूर्वीच सेनेने बिनविरोध कब्जा केला होता. मतदान झालेल्या दोन्ही जागेवर काँग्रेसने कब्जा मिळवला आहे.

भाजप विधान परिषद आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा तालुक्यातील दत्तक लोणी गावात सत्तांतर झाले आहे. 9 पैकी 7 जागेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.  त्यात शिवसेनेच्या 5 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा विजयी झाल्या तर 2 जागेवर भाजपचा विजय झाला आहे.

First published:

Tags: Gram panchayat