मुंबई, 16 नोव्हेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्या होणाऱ्या NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जात आहे. आता भाजपप्रणित एनडीएचा भाग नसल्याने शिवसेना खासदारांच्या सभागृहात बसण्याच्या जागाही बदलणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे राज्यसभेचे सदस्य आहेत. सत्ताधारी बाकांवरून त्यांची रवानगी आता विरोधी बाकांवर होणार आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. या अधिवेशनात शिवसेना खासदार पहिल्यांदाच विरोधी बाकांवर बसलेले दिसतील.
Rajya Sabha sources: The seating arrangement of Shiv Sena MPs Sanjay Raut & Anil Desai in the Parliament has changed now. Shiv Sena will sit in opposition now. (File pics) pic.twitter.com/tg6gJtujPv
— ANI (@ANI) November 16, 2019
सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांची बैठक उद्या म्हणजे रविवारी होणार आहे. परंतु, या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत तसा खुलासाही केला आहे. आता शिवसेना 'रालोआ'तून बाहेर पडली तर त्यांच्या खासदारांची जागा बदलेल. दोन्ही सभागृहात शिवसेना नेते सत्ताधारी बाजूच्या बाकांवर बसत होते. ते आता विरोधी बाकांवर बसतील.
सत्ता स्थापनेचा संभ्रम वाढला, महाशिवआघाडीने राज्यपालांची भेट पुढे ढकलली
शिवसेनेचे राज्यसभेत राजकुमार धूत, संजय राऊत आणि अनिल देसाई असे तीन खासदार आहेत. लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. या सर्वांच्या बसण्याची जागा नव्या अधिवेशनात सत्ताधारी बाकांऐवजी विरोधी बाकांवर असेल. शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याविषयी अजूनही औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
शिवसेना NDAतून बाहेर पडणार? संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा
अवजड उद्योग मंत्रालय सेनेकडे होतं. राज्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा गेल्याच आठवड्यात दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा