Home /News /maharashtra /

सेना-भाजप वाद टोकाला; प्रमोद जठारांविरोधात राजन साळवींची तक्रार, संभाजी महाराजेंसोबत राणेंची तुलना केल्याचा आरोप

सेना-भाजप वाद टोकाला; प्रमोद जठारांविरोधात राजन साळवींची तक्रार, संभाजी महाराजेंसोबत राणेंची तुलना केल्याचा आरोप

Shiv Sena vs BJP: शिवसेनेने भाजप नेते प्रमोद जठार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 26 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजप (Shiv Sena vs BJP) यांच्यामधील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक झाल्यावर आता दोन्ही बाजूंकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत. लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी देखील अशीच एक तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात (Ratnagiri City Police) दिली आहे. शिवसेनेने आपल्या तक्रारीत म्हटलं, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे. प्रमोद जठार यांनी 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले असे वक्तव्य केले होते. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय झाली दोघांत चर्चा? तसेच जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे प्रमोद जठार यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी राजन साळवी यांनी या तक्रारीद्वारे केली आहे. राणेंचे बॅनर फाडले केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या स्वागताचे बॅनर जिल्ह्यात संपूर्ण हायवेवर लावण्यात आले आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणमध्येही नॅशनल हायवेच्या दुभाजकावर मंत्री राणेंच्या स्वागताचे बॅनर भाजपा कार्यकर्त्यांनी लावले आहेत. हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय जनतेची जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच भविष्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील संघर्ष अटळ दिसून येत आहे.
    First published:

    Tags: BJP, Narayan rane, Shiv sena

    पुढील बातम्या