औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप, महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये जुंपली

औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप, महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये जुंपली

औरंगाबाद महापालिकेमध्ये 30 वर्षे युतीत सत्तेत असलेल्या सेना-भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच जुंपली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,22 फेब्रुवारी:औरंगाबाद महापालिकेमध्ये 30 वर्षे युतीत सत्तेत असलेल्या सेना-भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच जुंपली आहे. भाजप सोडून शिवसेनेत दाखल झालेले किशनचंद तनवाणी यांच्याविरोधात भागवत कराड यांनी टीका केली होती. त्यावरून किशनचंद तनवाणी यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या घरावर दगडफेक करत शासकीय गाडीची तोडफोड केली होती.

आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपला सोडून सेनेत प्रवेश केला आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी तनवाणींवर टीका केली केली होती. कराड यांनी तनवाणी यांना 'सत्तेच्या गुळाला चिकटलेला मुंगळा' असे म्हटले होते. यामुळे तनवाणी समर्थक संतापले आणि भागवत कराड यांच्या घरावर हल्ला केला. हल्ल्यात तनवाणी यांचा हात असल्याचा आरोप कराड यांनी केला आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपीला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली

भाजप आमदाराचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या

भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर तनवाणी समर्थकांवर कारवाई करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, किशनचंद तनवाणी यांनी हल्ला करणारे भाजप पदाधिकारी असल्याचा पलटवार केला आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्या घरामध्ये उभ्या कारची अज्ञातांनी तोडफोड केली. घरावर अज्ञात हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. परंतु, हा हल्ला शिवसेना नेत्याच्या समर्थकांनी केला असल्याचं बोललं जात आहे.

धनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी

शुक्रवारी, भागवत कराड यांच्या घर, कार आणि दुचाकीवर आलेल्या 8 ते 10 जणांनी अचानकपणे दगडफेक केली. या दगडफेकीत कराड यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. दगडफेक करून अज्ञात तरुण पसार झाले. या घटनेनंतर डॉ.भागवत कराड,आमदार अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली होती.

किशनचंद तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या सेनाप्रवेशावर कराड यांनी तनवाणी यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आज कराड यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली.

सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहानग्या मित्रांचा करूण अंत

संतोष सुरे, रंगनाथ राठोड, सचिन झवेरी यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. याबद्दल सचिन झवेरी याने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये 'ज्याला स्वत:चे घर सांभाळता येत नाही तो भागवत कराड वर्तमानपत्रात अक्कल पाजळतोय, यापुढे कमरेखालेच वार होतील' असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये शहर अध्यक्ष बदलण्यात आला होता. याच निर्णयातून कराड यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी भाजपच्या गोटात नेते चर्चा करत आहे.

प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्यांनीच केली मुलीची हत्या, झोपेतच उशीने दाबले तोंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2020 06:23 PM IST

ताज्या बातम्या