मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिंधुदुर्गातील वातावरण तापलं, शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला

सिंधुदुर्गातील वातावरण तापलं, शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला

शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही शमण्याचं नाव घेत नाहीये. कोकणातील वातावरण आता तापलं असून खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला झाला आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही शमण्याचं नाव घेत नाहीये. कोकणातील वातावरण आता तापलं असून खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला झाला आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही शमण्याचं नाव घेत नाहीये. कोकणातील वातावरण आता तापलं असून खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

भारत केसरकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 25 ऑगस्ट : नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर नारायण राणेंना (Narayan Rane) अटक करण्यात आली. रात्री उशिरा राणेंना महाड न्यायलयाकडून (Mahad Court) जामीन मंजूर झाला आणि राणे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. त्याच दरम्यान रात्री शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांच्या घरावर हल्ला झाला.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या घरावर काल रात्री उशिरा अज्ञाताने काचेच्या बाटल्या फेकून पलायन केले. ही घटना काल उशिरा घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ह्या बाटल्या राऊत यांच्या घरावर फेकल्या आणि घटनास्थळावरुन पलायन केले. खासदार विनायक राऊत यांचे घर मालवण तालुक्यातील तळगावमध्ये घर आहे. या घरात राऊत यांचे निकटवर्तीय नातेवाईक राहतात. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक तळगाव येथे दाखल झाले. यानंतर राऊत यांच्या नातेवाईकांनी मालवण तालुक्यातील कट्टा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Narayan Rane: महाडमध्ये जामीन मिळाला पण आता नाशकातून आलं नवं संकट

सिंधुदुर्गात मनाई आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी आजपासून 7 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्हात होणार का? राणे ही यात्रा घेतात की थांबवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

27 व 28 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हात राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा होत आहे. मात्र मनाई आदेश असताना ही यात्रा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय हेवेदाव्यास्तव आमने सामने येवून आंदोलने करीत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. विविध समाजाच्या आरक्षणावरुन विविध संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना त्यांच्या अषालेल्या मागण्यांच्या संबंधाने न्याय मिळवून घेण्याकरिता आक्रमक झालेल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलने, निदर्शने होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न नाकारता येत नाही.

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॕस दरवाढ व इतर कारणावरुन राजकीय पक्षाकडून टीका टिपणी केली जात आहे. या कारणावरुन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलने, निदर्शने होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यानुसार जिल्ह्यांत 7 सप्टेंबर रोजी 12 वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आली आहे.

First published:

Tags: Narayan rane, Sindhudurg