मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shiv Sena Tanaji Sawant : ...आणि तानाजी सावंत झाले लेट, फडणवीस म्हणाले नाव कट करणार होतो video

Shiv Sena Tanaji Sawant : ...आणि तानाजी सावंत झाले लेट, फडणवीस म्हणाले नाव कट करणार होतो video

तब्बल दिडमहिन्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. दरम्यान यामध्ये कोणाला संधी मिळणार कोणाला नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत समजू शकले नव्हते.

तब्बल दिडमहिन्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. दरम्यान यामध्ये कोणाला संधी मिळणार कोणाला नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत समजू शकले नव्हते.

तब्बल दिडमहिन्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. दरम्यान यामध्ये कोणाला संधी मिळणार कोणाला नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत समजू शकले नव्हते.

  मुंबई, 09 ऑगस्ट : तब्बल दिडमहिन्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. दरम्यान यामध्ये कोणाला संधी मिळणार कोणाला नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत समजू शकले नव्हते. भाजपकडून कोणाला संधी मिळणार तर शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार यावर चर्चा सुरू असताना एक वेगळाच किस्सा अनुभवयास मिळाला आहे. अगदी शेवटच्या क्षणी तानाजी सावंत (Shiv Sena Tanaji Sawant) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सावंत अगदी शेवटच्या क्षणी राजभवनातील सभागृहात दाखल झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

  तानाजी सावंत धावत येताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, तुम्ही थोडा वेळ केला असता तर तुमचे नाव आता कट होणारच होते. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने तानाजी सावंत यांचा पत्ता कट होता होता वाचला आहे. त्यांच्या या व्हीडिओने जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळणार का यावरच मोठा गोंधळ सुरू होता त्यांना अगदी शेवटच्या क्षणी समजल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत शेवटच्या क्षणी धापा टाकतच शपथ घेतल्याचे दिसून आले.

  हे ही वाचा : मंत्रिमंडळात एकाही अपक्ष आणि मित्रपक्षाला स्थान नाही; नाराज बच्चू कडूंनी केला 'प्रहार'

  एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान नाही

  अखेर 39 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण, या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त टीकास्त्र सोडले आहे.

  शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे. एकूण 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात शपथ दिली. पण, यावेळी एकाही महिलेला संधी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  हे ही वाचा : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना बिहारमध्ये भाजपला मोठा झटका! नितीश कुमारांचा धक्का

  'स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या