मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'...म्हणून आम्ही आंदोलनं केली', नितीन गडकरींनी ज्या शिवसैनिकाची तक्रार केली, ते आले समोर, VIDEO

'...म्हणून आम्ही आंदोलनं केली', नितीन गडकरींनी ज्या शिवसैनिकाची तक्रार केली, ते आले समोर, VIDEO

शिवसेनेचे रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांचाच तो ऑडिओ क्लिपमधला आवाज होता.

शिवसेनेचे रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांचाच तो ऑडिओ क्लिपमधला आवाज होता.

शिवसेनेचे रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांचाच तो ऑडिओ क्लिपमधला आवाज होता.

किशोर गोमासे,प्रतिनिधी

वाशिम, 14 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Letter to Maharashtra CM) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून एका कार्यकर्त्यांची तक्रार केली आहे. या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. ज्या शिवसैनिकाचा ऑडिओ व्हायरल झाला होता, त्यांनी समोर येऊन खुलासा केला आहे.

शिवसेनेचे रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांचाच तो ऑडिओ क्लिपमधला आवाज होता. 'नितीन गडकरी साहेब जिल्ह्यातील ज्या रस्त्याचे काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नाही, विरोध असता तर आम्ही जिल्ह्यातील 90 टक्के रस्त्यांची कामं झाली नसती, असं महादेवराव ठाकरे म्हणाले.

तसंच, ज्या ठिकाणी शिवसेनेनं आंदोलनं केली. त्या ठिकाणी कंत्राटदाराच्या चुकीमुळे धुळ उडाली, पिकांचे नुकसान झाले. अनेक अपघात झाले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही काम केलं.  मात्र शिवसेनेने जिल्ह्यात कोणत्याच रस्त्याचे काम अडविलेले नाहीत संपूर्ण आरोप करण्यात आले ते खोटे असल्याचंही महादेवराव ठाकरे यांनी सांगितलं.

जालन्यात पुजाऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO ही केला शूट

त्याआधी महादेव ठाकरे यांचा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हिडीओ क्लिपमध्ये त्यांनी काम थांबवण्याची मागणी एका कंत्राटदाराकडे केली होती.

काय म्हणाले नितीन गडकरी पत्रात?

वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी रा.मा.क्र.753 सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे कामं बंद पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कंत्राटदाराला मारण्याची धमकी  देऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान खासदार भावना गवळी याच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये राष्ट्रीय मार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना अडथळा निर्माण करत आहे असे थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

15 ऑगस्टपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळला, जैशच्या 4 अतिरेक्यांना अटक

अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची कामं रखडली असून याचं कारण शिवसेना कार्यकर्त्यांनी कामं थांबवली असल्याची माहिती मिळाल्याचं गडकरी म्हणाले. यासंदर्भात गडकरींनी पत्रामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं देऊन या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.

अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज 2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (12 किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

First published:

Tags: Congress, Nitin gadkari, Shivsena