मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेच्या भूमिकेने सर्वत्र खळबळ, 'या' निवडणुकीत चक्क MIMला दिला पाठिंबा

शिवसेनेच्या भूमिकेने सर्वत्र खळबळ, 'या' निवडणुकीत चक्क MIMला दिला पाठिंबा

कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा दिला आहे.

कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा दिला आहे.

कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा दिला आहे.

अमरावती, 13 मार्च : अमरावती येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने चक्क MIM ला पाठिंबा (Shivsena Supports MIM) दिला आहे. यामुळे भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावार टीकेची झोड उठवली.

स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिरीष रासने यांनी बाजी मारली. या निवडणुकीत भाजपचे शिरीष रासने यांना 9 मते मिळाली तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना 6 मते मिळाली.

अमरावती महानगरपालिकेत पक्षीय बलाबल

भाजपा 8

युवा स्वाभिमान- 1

काँग्रेस - 3

एम आय एम - 2

शिवसेना - 1

बीएसपी - 1

भाजपच्या वतीने स्थायी समिती सभापतीपदासाठी शिरीष रासने यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपचे दोन सदस्य नाराज झाले होते, भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी काँग्रेस ,शिवसेना, एमआयएम आणि बीएसपी यांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मात्र ऐनवेळी बसपाचे गटनेते चेतन पवार हे निवडणुकीत गैरहजर राहिले. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी झालं. बीएसपीचे गटनेते चेतन पवार जर काँग्रेस शिवसेना एम आय एम च्या बाजूने उभे राहिले असते तर भाजपाचे 2 नाराज सदस्य गैरहजर राहणार होते.

हेही वाचा - शिवसेनेतील 2 नेत्यांमध्ये निर्माण झाला टोकाचा संघर्ष, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं!

अशा परिस्थितीत ईश्वर चिठ्ठीने ही निवडणूक झाली असती. मात्र ऐन वेळी बीएसपीचे चेतन पवार गैरहजर राहिल्याने एमआयएमच्या वतीने अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना स्थायी समिती सभापती पदासाठी उभे करण्यात आले.

भाजपला रोखण्यासाठी एमआयएमच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला तर बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. आमदार रवी रणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका सदस्याने भाजपच्या रासने यांना पाठिंबा दिला.

First published:
top videos

    Tags: Amravati, MIM, Shivsena