मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांनी काढला तोडगा, एकनाथ शिंदेंनाही दिला सल्ला!

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांनी काढला तोडगा, एकनाथ शिंदेंनाही दिला सल्ला!


'राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे मुख्यमंत्री असतात. त्यांनी राज्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी अनेक वेळा शिवाजी पार्कवर'

'राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे मुख्यमंत्री असतात. त्यांनी राज्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी अनेक वेळा शिवाजी पार्कवर'

'दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे....'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

पंढरपूर, 19 सप्टेंबर : शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार यावरून वाद निर्माण झाला आहे. 'दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित आहे. शिंदे गटाला बीकेसीचे मैदान मिळाले आहे, त्यामुळे आता त्यांनी विरोध करू नये', असा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

शिवसेनेनं दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवतीर्थावर तयारी सुरू केली आहे. पण, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट पडले आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही.  दसरा मेळावा मागील 40 वर्षांपासून पाहतोय. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची त्यांची परंपरा आहे. शिंदे यांना जर BKC मैदान दिलं असेल तर दुसऱ्यांना विरोध करणे योग्य नाही असा सल्ला पवार यांनी दिला आहे.

(gram panchayat election result : भाजपची सेंच्युरी, राष्ट्रवादीचेही अर्धशतक, शिवसेना मात्र बॅकफूटवर)

तसंच, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वाढदिवसाला चित्ते आणले आहेत. यावरून पवार यांनी टोला लगावला आहे. 'जुन्नर मधील शेतकऱ्याने पंतप्रधान यांना पत्र लिहून  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या शेतमालाला भाव नाही. अशी खंत व्यक्त करत आत्महत्या केली. ज्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असेल तर त्या राज्यकर्त्यांनी काय वाढदिवस साजरे करायचे कशाचे कर्तुत्व यांचे असं म्हणत  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

(संजय राऊतांना दिलासा नाहीच! जेलमध्ये मुक्काम वाढला, कोर्टाने दिला नकार)

राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू आहे. त्यांच्या अशा मोठ्या पदयात्रेचा उपयोग होईल. यापूर्वी चंद्रशेखर यांच्या एकेकाळच्या पदयात्रेला प्रतिसाद मिळाला होता. मी जळगाव ते नागपूर काढलेल्या पद यात्रेला प्रतिसाद मिळाला होता, असं म्हणत पवारांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे समर्थन केले आहे.

First published: