• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मिलिंद नार्वेकरांचा आलिशान बंगला जमीनदोस्त; पुढचा नंबर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा, किरीट सोमय्यांचा दावा

मिलिंद नार्वेकरांचा आलिशान बंगला जमीनदोस्त; पुढचा नंबर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा, किरीट सोमय्यांचा दावा

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 ऑगस्ट : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड 3 मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. पुढचा नंबर मंत्री अनिल परबांच्या रिसॉर्टचा? भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, करून दाखविले, मिलिंद नार्वेकर यांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो तोडण्याचे / पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. उद्या 23 ऑगस्ट रोजी मी दापोलीला जावून प्रत्यक्ष ह्या तोडकामाची पाहणी करणार आहे. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असेल. नारायण राणेंच्या ऑफरवर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया म्हणाले... बंगला स्वत:हून तोडला? रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड दापोली समुद्र किनार्यावर CRZ कायद्याच्या आत येणारा बंगाला तोडण्यात आलांय. हा प्रशासनाने तोडला नसून स्थानिक बंगला मालकाने स्व:ताहून तोडल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. सदर बंगला तोडायचा असल्यास प्रशासनाकडून आधी पूर्व सूचना देणारी नोटीस दिली जाते. पण अशी कोणतीही नोटीस सदर बंगल्याला मिळालेली नाहीये. CRZ कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येताच स्थानिक बंगला मालकाने स्वत:हूनच हा बंगला तोडल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. या संदर्भात दापोली तालुका तहसील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही अशा प्रकारे कोणतीही नोटीस बंगल्याला बजावली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट संदर्भातही किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे. अनिल परब यांचे हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती त्यानंतर केंद्रीय पथकाने सुद्धा या रिसॉर्टची पहाणी केली होती.
    First published: