निलेश पवार,(प्रतिनिधी)
नंदुरबार, 9 जानेवारी: अक्कलकुव्वा शहरात शिवसेनेचे कार्यालय जाळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री अज्ञात लोकांनी महामार्गावरील शिवसेनेचे कार्यलय जाळले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुव्वा शहरात तणाव पसरला आहे.
मिळालेली माहिती अशी की, अक्कलकुव्वा शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये जुना वाद आहे. त्यात बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीत एका गटात काँग्रेसला तर दुसऱ्या गटात भाजपला बहुमत मिळाले आहे.
पोलिस स्टेशनमध्ये जमाव..
शिवसेना कार्यालय जाळल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. दोषींना तात्काळ अटक करा या मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. अक्कलकुव्वा पोलिस स्टेशनमध्ये शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.
बाजारपेठेत शुकशुकाट..
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुव्वा शहरात तणाव पसरला आहे. पोलिसांना नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. शहरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरासह बाजारपेठेत शुकशुकाट असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.