उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी घेणार 'हा' निर्णय

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी घेणार 'हा' निर्णय

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. 1 डिसेंबरला मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 4 दिवसातच फडणवीस सरकार कोसळलं. त्यानंतर हॉटेल ट्रायडेंटमध्ये महाविकासआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. 1 डिसेंबरला मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुद्दा मार्गी लावणार असल्याची चर्चा आहे.

खरंतर, भाजप-सेना युतीच्या काळातल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे उघड आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - अबकी बार, ठाकरे सरकार; उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री!

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने सत्ता स्थापन केली तर बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार, असं म्हटलं होतं. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 25 टक्के निधी देणार आहे, असं ठरलं आहे. पण आता सरकार बदलल्यावर हा प्रकल्प बासनात गुंडाळणार की नवं सरकार त्याकडे सपशेल दुर्लक्ष करणार हे लवकरच स्पष्ट होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोधही झाला होता.

मोठी बातमी - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री..., महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची लिस्ट

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा कुठल्या पक्षाने केलेली नसली, तरी तशी मागणी मात्र त्यांनी केलेली आहे. पण या कर्जमाफीसाठी निधी कुठून आणायचा हा प्रश्न आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार भाजपचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निधीचा यासाठी वापर करू शकतं.

इतर बातम्या - राजकारणाला नवं वळण, राजकीय सन्यास घेणार का अजित पवार?

राज्य सरकार या प्रकल्पासाठी 25 टक्के हिस्सा देणार आहे. त्यापोटी 5000 कोटी रुपये द्यावे लागतील. हेच पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्याचा विचार आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा होता. त्यामुळे तिन्ही पक्षांना आपापली आश्वासनपुर्ती करता येईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची गरज काय, यातून गुजरातला जास्त फायदा होणार, अशी टीका या प्रकल्पावर पहिल्यापासूनच होत होती. विरोधकांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतले होते.

First published: November 26, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading