महाराष्ट्राचं नवं राजकीय समीकरण : मोदींचं सर्वात मोठं स्वप्न धोक्यात आणणार?

महाराष्ट्राचं नवं राजकीय समीकरण : मोदींचं सर्वात मोठं स्वप्न धोक्यात आणणार?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्यात येणार, असं वृत्त आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पर्यायी सरकार येण्याची शक्यता वाढलेली असताना आता भाजप-सेना युतीच्या काळातल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे उघड आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्यात येणार, असं वृत्त आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने सत्ता स्थापन केली तर बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार, असं म्हटलं आहे.

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 25 टक्के निधी देणार आहे, असं ठरलं आहे. पण आता सरकार बदलल्यावर हा प्रकल्प बासनात गुंडाळणार की नवं सरकार त्याकडे सपशेल दुर्लक्ष करणार हे लवकरच स्पष्ट होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोधही झाला होता.

वाचा - High Alert सुरक्षा दलांवर 'ड्रोन'ने हल्ल्याचा माओवाद्यांचा प्लान, Maoist plans t

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा कुठल्या पक्षाने केलेली नसली, तरी तशी मागणी मात्र त्यांनी केलेली आहे. पण या कर्जमाफीसाठी निधी कुठून आणायचा हा प्रश्न आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार भाजपचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निधीचा यासाठी वापर करू शकतं.

वाचा - महाविकासआघाडीची निर्णय झाला तरी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी होणार विलंब!

राज्य सरकार या प्रकल्पासाठी 25 टक्के हिस्सा देणार आहे. त्यापोटी 5000 कोटी रुपये द्यावे लागतील. हेच पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्याचा विचार आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा होता. त्यामुळे तिन्ही पक्षांना आपापली आश्वासनपुर्ती करता येईल.

वाचा - काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत, मात्र फॉर्म्युला अजुनही गुलदस्त्यात

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची गरज काय, यातून गुजरातला जास्त फायदा होणार, अशी टीका या प्रकल्पावर पहिल्यापासूनच होत होती. विरोधकांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या