मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रत्नागिरीत शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष शिगेला, रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात कोर्टात दावा

रत्नागिरीत शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष शिगेला, रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात कोर्टात दावा

 खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला

या प्रकरणी माजी मंत्री रामदास कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय कदम यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

खेड, 09 ऑगस्ट : राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार (mva goverment) असले तरी कोकणातील रत्नागिरी (rantagiri) जिल्ह्यात राष्ट्रवादी (ncp) विरुद्ध शिवसेना (shivsena) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (ramdas kadam) यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (sanjay kadam) यांच्यावर उच्च न्यायालयाच्या (h) आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दावा दाखल केला आहे.

दापोली (dapoli) विधानसभा मतदार संघात निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांच्याविरोधात रामदास कदम यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार योगेश कदम हे उभे होते. त्यावेळी रामदास कदम यांची मान हानी होईल आणि त्यांची प्रतिष्ठेला डाग लागेल असे कृत्य संजय कदम यांनी केले होते. तसंच त्यांच्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या डेन्टल कॉलेजच्या जागा जमिनीबाबत निराधार वक्तव्य केले होते.

Apple Watch ने पुन्हा एकदा वाचवला तरुणाचा जीव; मृत्यूच्या दाढेतून परत आणलं

या प्रकरणी माजी मंत्री रामदास कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय कदम यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावेळी आमदार संजय कदम यांनी न्यायालयात रामदास कदम यांची विनाशर्त माफी मागितली होती व पुन्हा असे कृत्य करणार नाही, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये चालक पदाच्या इतक्या जागांसाठी भरती

मात्र आपला मुलगा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या विरोधात तसंच आपल्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या विरोधात काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आरोप करत न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा भंग करत न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात आपण संजय कदम यांच्याविरोधात दावा दाखल केला, असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Dapoli, NCP, Ramdas kadam, Ratnagiri, Shivsena