भाजपमध्ये नारायण राणेंची स्थिती म्हणजे 'ना घर का ना घाट का' अशी, शिवसेना नेत्याचा पलटवार

भाजपमध्ये नारायण राणेंची स्थिती म्हणजे 'ना घर का ना घाट का' अशी, शिवसेना नेत्याचा पलटवार

राज्य कार्यकारणीतही नारायण राणे यांना स्थान न देवून भाजपनं त्यांची जागा दाखवून दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै: भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची स्थिती म्हणजे 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे. राज्य कार्यकारणीतही नारायण राणे यांना स्थान न देवून भाजपनं त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांचे काम केवळ बोल घेवडेपणाचे आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खालदार विनायक राऊत यांना नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

'कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं, तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने नारायण राणे यांना पछाडलेलं आहे, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग

मराठा आरक्षण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आदी मुद्द्यावर गुरूवारी भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

'सामना'तून आतापर्यंत शरद पवारांविरोधात बातम्या येत असताना आता त्यांची मुलाखत घेतली जात आहे, याचा पुरावा नारायण राणे यांनी वृत्तपत्रांसह यावेळी दाखवला होता. नोकरी 'सामना'त पण काम मात्र पवारांचं असा टोला देखील राणेंनी यावेळी लगावला होता. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार असले तरी ते शरद पवारांचा 'खास माणूस' आहे. दिल्लीत ते जास्त वेळ पवारांकडे असतात. पवारांचा खास माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे, अशीही टीका राणेंनी केली.

हेही वाचा...अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

फक्त बाळासाहेब ठाकरे सोडा पण उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची ही मॅरेथॉन टीका आहे. भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी ही मुलाखत घेतली होती, असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.

Published by: Sandip Parolekar
First published: July 17, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या