मुंबई, 06 ऑगस्ट : 'बेळगावमध्ये (Belgaum election results) मराठी माणसाचा पराभव घडवून आणला गेला आहे. हा अनपेक्षित निकाल आहे. महाराष्ट्रातला (maharashtra) मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जात आहे. ही नादानी आहे. अशी इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. लाज नाही वाटत का? असा संताप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निकालात भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकहाती सत्ता मिळवत भाजपनं बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं. भाजपनं 36 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 4 उमदेवार विजयी झाले आहे. या निकालावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
एक विवाह ऐसा भी'! 90 वर्षीय वृद्धानं केलं 75 वर्षाच्या महिलेसोबत लग्न
'कर्नाटक सरकारने मराठी एकिकरण समितीचा पराभव घडवून आणला आहे. त्यामुळे बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये. आज महाराष्ट्रातला मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातायत. ही नादानी आहे. अशी इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. लाज नाही वाटत का? पेढे वाटताना जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे. राजकारण बाजूला ठेवा तिथला भगवा कर्नाटकने उतरवला तेव्हा तुम्ही का गप्प बसता? असा सवाल राऊत यांनी विचारला.
तसंच, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे सुद्धा मराठी एकीकरण समितीच्या पाठिशी राहिली आहे. राजकारण नव्हते यातआम्ही दु:खी आहोत. आम्ही तिथे जावून लढण्याचा विश्वास देवू. गणपतीनंतर मी तिथे जाईन, असंही राऊत म्हणाले.
VIDEO: टॉस जिंकताच ब्राव्होनं गायलं गाणं, प्रतिस्पर्धी कॅप्टननही दिली साथ!
'अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासंदर्भात कुणाला दु:ख वाटते का? चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते त्यावर मी बोललो. पाठीत खंजीर खुपसणं आमची पद्धत नाही. कधी यायचं पुण्यात सांगा? मी येतो, असं आव्हानच राऊत यांनी पाटलांना दिलं.
'कायदे तोडण्याची प्रक्रिया केंद्राने सुरू केली. गर्दी जमवण्याचा विषाणू जनआशीर्वाद यात्रेतून आला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.