राज्यपालांच्या 'त्या' पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच, संजय राऊत म्हणाले..

राज्यपालांच्या 'त्या' पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच, संजय राऊत म्हणाले..

अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर: महाराष्ट्रात (Maharastra) मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं होतं. 'तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?' असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी 'ते शब्द टाळायला पाहिजे होते', असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत स्वागत केलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा...'...तर सुशांतचा मुद्दा तयार झालाच नसता', अमित शहांनी ठाकरे सरकारला लगावला टोला

संजय राऊत म्हणाले, 'राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.' मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण राज्यातील भाजप नेत्यांनी केलं. जेडीयूच्या नेत्यांनी त्याचा बिहारच्या निवडणुकीत मुद्दा केला. सीबीआय दोन महिने झालं तपास करतंय त्याचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ड्रग्जचा विषय फक्त बॉलीवूडचा नसून त्याचा संबंध संपूर्ण जगाशी आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

'ते शब्द टाळायला पाहिजे होते'

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वादग्रस्त पत्र लिहिलं होतं. मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहिताना राज्यपालांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याची चर्चा झाली. याबाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली असतानाच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केलं आहे.

'महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात? असं राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं. याकडे तुमचा पक्ष कसं बघत आहे?' असा प्रश्न 'न्यूज18'चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी अमित शहा यांना विचारला. यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, 'राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरं झालं असतं.' 'मी ते पत्र वाचलं. त्यांनी एक संदर्भ देताना पत्रात तसा उल्लेख केला. मात्र ते टाळायला हवं होतं,' असं राज्यपालांच्या पत्राबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले.

हेही वाचा..नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवक पोहोचले शिवसेना नेत्यांच्या दरबारी

हे आहेत राज्यपालांचे 'ते' वादग्रस्त शब्द 

मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकार उशीर करत आहे, याबाबत नाराजी व्यक्त करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट 'तुम्ही आता अचानक सेक्युलर झाला आहात की काय?' असा मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2020, 12:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading