शरद पवारांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची सोनसाखळी लांबवली

शरद पवारांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची सोनसाखळी लांबवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत.

  • Share this:

उस्मानाबाद, 18 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. अतिदृष्टीमुळे नुकसानगस्त भागाची ते पाहाणी करत आहे. मात्र, या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उमरगा-लोहाराचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली.

अज्ञात चोरट्यांनी आमदाराच्या सोनसाखळीवरच डल्ला मारल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे.

हेही वाचा...बरोबर वर्ष झालं.. रोहित पवारांनी शेअर केला आजोबांचा भर पावसातला 'तो' VIDEO

शेतकऱ्यांचं नुकसान पाहून काय म्हणाले शरद पवार...?

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर 'येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी', अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 'शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

परतीच्या पावसामुळे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आज सकाळी जेव्हा शरद पवार हे सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दाखल झाले. शरद पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ एकच गर्दी केली होती. शरद पवार आपल्या ताफ्याकडे जसे पुढे वळले तसा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच गराडा घातला.

हेही वाचा...अरे! पुण्यात अख्खा बसस्टॉपच गेला चोरीला; शोधून दिल्यास मिळणार बक्षीस

कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे. मात्र, हा नियम शरद पवार यांच्या समोरच तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. त्यामुळे खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगू लागले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले.

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading