मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ये घ्या रे त्याला' म्हणत स्टेजच्या मागे व्यवस्थापकाला मारहाण, नितेश राणेंना अटक होणार?

'ये घ्या रे त्याला' म्हणत स्टेजच्या मागे व्यवस्थापकाला मारहाण, नितेश राणेंना अटक होणार?

नितेश राणे

नितेश राणे

'ये घ्या रे त्याला' म्हणत कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या मागील बाजूस नेऊन नितेश राणे यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक खरात यांना मारहाण केली होती, असा आरोप शिवसेना आमदारांनी केला आहे.

  • Published by:  Chetan Patil
सिंधुदुर्ग, 16 ऑगस्ट : आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना आमदार आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी केली आहे. 'उमेद'च्या कार्यक्रमात 14 ऑगस्ट रोजी  उमेद अभियान व्यवस्थापकाला नितेश राणे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप करत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नितेश राणे यांच्या सांगण्यावरून उमेद अभियान व्यवस्थापकाकाल मारहाण झाली होती. 'ये घ्या रे त्याला' म्हणत कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या मागील बाजूस नेऊन नितेश राणे यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक खरात यांना मारहाण केली होती, असा आरोप शिवसेना आमदारांनी केला आहे. (राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ) "वारंवार सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अशा आमदारावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ अटक करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल", असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील आपसातला वाद काही संपायला नाव घेताना दिसत नाहीय. कारण शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सामंतांनी वैभव नाईक यांच्या पराभवासाठी राणेंच्या समर्थक उमेदवाराला 50 लाख रुपये दिल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवरुन नितेश राणे आणि उदय सामंत यांनी सडकून टीका केली आहे.
First published:

Tags: BJP, Shiv sena

पुढील बातम्या