Home /News /maharashtra /

अजित पवारांच्या या निर्णयावर शिवसेनेचे आमदार नाराज, केली खोचक टीका

अजित पवारांच्या या निर्णयावर शिवसेनेचे आमदार नाराज, केली खोचक टीका

मराठवाड्यावरील 'दुष्काळग्रस्त' शिक्का पुसण्यासाठी 21 टीमसी पाणी असेल किंवा वाटर ग्रीड असेल या योजना गरजेच्या आहेत.

उस्मानाबाद,4 फेब्रुवारी: दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेली वॉटर ग्रीड ही योजना तांत्रिक दृष्टया सक्षम नसल्याने ती बंद करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आता अजित पवार यांच्या या योजना बंद करण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीतील शिवसेना आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यावरील 'दुष्काळग्रस्त' शिक्का पुसण्यासाठी 21 टीमसी पाणी असेल किंवा वाटर ग्रीड असेल या योजना गरजेच्या आहेत. त्या सुरू राहिल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आम्ही आता सत्तेत आहोत, या योजना व हे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू प्रसंगी मराठवाड्यातील सर्व आमदार एकत्र येऊ, असे वक्तव्यही आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे. गेली अनेक दिवसांपासून मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मी नाराज नसून माझ्या नारजीच्या बातम्या या फक्त मीडियामध्येच आहेत. माझी भूमिका ही पक्षप्रमुख यांना माहीत असल्याचे तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तानाजी सावंत यांनी मंगळवारी तुळजाभवानीच दर्शन घेतले. हक्काच्या पाण्यासाठीच्या पंकजा मुंडे यांचं उपोषण मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबदेत उपोषण केले होते. या उपोषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे पाटीलही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी हे सरकार विरोधातलं उपोषण नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहेत, मी भाजपची कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार, मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे, मला अमेरिका राष्ट्राध्यक्ष दिलं तरी मला ते नको, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. सरकार येऊन शंभर दिवस झाले नाही तोच उपोषण केलं त्यामुळं काहीजण पोटशूळ आला असं म्हणतील, मात्र सरकारनं स्वप्न पूर्ण करावं, शेतात पाणी आल्यावर तो आत्महत्या करणार नाही, त्याला कर्जमाफीची गरज नाही. माझा कारखाना असून खूप अडचणी आहे, कसा लोकांना रोजगार मिळेल, पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही, इथले लोक रोजगार साठी स्थलांतर करत आहेत, काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग नाही लोभ नाही, मी समाजसेविका आहे, सरकार विरोधी उपोषण नाही तर लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण केलं. माझा कारखाना असून खूप अडचणी आहेत. कसा लोकांना रोजगार मिळेल, पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही, इथले लोक रोजगार साठी स्थलांतर करत आहेत, काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग नाही लोभ नाही.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pankaja munde

पुढील बातम्या