SPECIAL REPORT : अन् शिवसेनेच्या आमदाराने धुतले कार्यकर्त्याचे पाय!

SPECIAL REPORT : अन् शिवसेनेच्या आमदाराने धुतले कार्यकर्त्याचे पाय!

नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्यातलं नातंही अनोखं असतं. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या कार्यकर्त्यासाठी डोक्यावर चप्पल घेऊन गेले.

  • Share this:

बुलडाणा, 08 नोव्हेंबर : नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्यातलं नातंही अनोखं असतं. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या कार्यकर्त्यासाठी डोक्यावर चप्पल घेऊन गेले. कारण अनिल पवार या त्यांच्या कार्यकर्त्यानं गायकवाड आमदार झाल्याशिवाय चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली होती. मागील पंधरा वर्षांपासून अनवाणी फिरणाऱ्या अनिल पवारनं अखेर आमदाराच्या हातून चप्पल घातली.

बुलडाण्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार त्यांच्या कारमधून मोताळा तालुक्यातले नेहरूनगरमध्ये पोहोचले. काहीच मिनिटात त्यांच्या हाती चपलेचा जोड, शाल, श्रीफळ देण्यात आला. तो त्यांनी डोक्यावर ठेवून चालायला सुरूवात केली. आमदार डोक्यावर चप्पल घेऊन जातोय हे दृश्य कधी कोणी पाहिलं नव्हतं.

पण इथं हे घडलं आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे कार्यकर्ते अनिल पवार यांना खूर्चीवर बसवलं. अनिल पवार यांचे पाय धुवून नॅपकीन पाय कोरडे केले. नवी कोरी चप्पल अनिल पवार यांना दिली. त्यानंतर अनिल यांना शाल. श्रीफळ दिलं. हार घालून अनिल पवारांचा सत्कार केला.

2004 मध्ये संजय गायकवाड यांचा पराभव झाला होता. त्यावेळी अनिल पवारांनी गायकवाड निवडून येतील तेव्हाच चप्पल घालेन, अशी प्रतिज्ञा केली होती.

खडी फोडण्याचं काम करणाऱ्या अनिल पवार मागील पंधरा वर्ष त्यांच्या प्रतिज्ञेपासून एकदाही ढळले नाही. संजय गायकवाड यांनीही अनिल यांना चप्पल घालण्याची विनंती अनेकदा केली होती.

अखेर संजय गायकवाड मोठ्या मतांनी विजयी झाले आणि अनिल पवार यांची प्रतिज्ञा फळाला आली. आमदार त्याच्या कार्यकर्त्याला चप्पल घालण्यासाठी पोहोचले. हे दृश्य पाहून उपस्थित शिवसैनिक आणि गावकरी गहिवरून गेले.

निवडणुकीच्या काळात बडे नेते पक्षांतर करताना दिसतात. अशा वेळी आपला नेता आमदार व्हावा यासाठी पंधरा वर्ष अनवाणी फिरणारा कार्यकर्ता आणि त्याची आठवण ठेवणारा आमदार, या दोघांचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे.

==============

First Published: Nov 8, 2019 08:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading