• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • संजय गायकवाडांनी नितेश राणेंना सुनावले, म्हणाले, 'नारायण राणेंच्या....!'

संजय गायकवाडांनी नितेश राणेंना सुनावले, म्हणाले, 'नारायण राणेंच्या....!'

' मी याबद्दल बोलण्यासाठी नितेश राणेंना फोनही केला होता, मात्र बोलणे झाले नाही'

 • Share this:
  बुलडाणा, 19 एप्रिल : शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार हल्ला केला होता. पण, आता संजय गायकवाड यांनी भाजप नेत्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांना बेंडुक अशी उपमा देऊन चांगलेच सुनावले आहे. बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून  पहिला प्रयोग तुझ्या मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू' अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर उत्तर देत संजय गायकवाड यांनी नितेश राणेंची यांची तुलना थेट बेंडकाशी केली. OMG! छोट्या पडद्यावरील कलाकार दिवसाला घेतात इतकं मानधन; आकडा वाचूनच येईल चक्कर 'मी काय टीका केली आणि नारायण राणे यांचा बेंडुक नितेश राणे याने टीका केली. या कोंबड्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची मग आम्ही काय  त्यांची पूजा करायची. तुम्ही मुख्यमंत्र्यांना काम करू देत नाही, खालच्या पातळीवर टीका करता, मी याबद्दल बोलण्यासाठी नितेश राणेंना फोनही केला होता, मात्र बोलणे झाले नाही. त्यांना ट्वीट करूनच उत्तर देणार आहे, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. तसंच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळीराम संबोधले होते, आणि 'त्यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला लगावला होता.  त्यावर पलटवार करत आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडेबोल सुनावले आहे. काय आहे सेक्स सरोगेट? इस्त्रायली जखमी जवानांना सरकारी खर्चातून दिली जाते थेरपी 'मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा आणि फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात, असा टोला लगावला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: