'खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालणार '

'खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालणार '

'अधिकाऱ्यांकडे फंड असताना ते कामं करत नाहीत फक्त पैसे लुटण्याचं काम सुरू असतं, लोकांनी सहन किती करायचं.'

  • Share this:

दिनेश केळुस्कर, राजापूर 11 जुलै : मुसळधार पावसामुळे कोकणातल्या रस्त्यांची दैना उडालीय. आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांवर चिखलफेक केली आणि ते प्रकरण राज्यभर गाजलं. त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली आणि समर्थनही मिळालं. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार राजन साळवी अधिकाऱ्यांवर भडकले आहेत. राणेंनी राडा केला आणि कणकवलीतले रस्ते दुरुस्ती सुरू झाली मग राजापूरमधल्या रस्त्याची कामं का होत नाहीत असा सवाल साळवी यांनी केलाय. खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालू असा इशाराच त्यांनी दिला.

हरियाणातल्या या बड्या नेत्याचा बाळासाहेब ठाकरे स्टाईलने आंदोलनाचा इशारा

KCC ही कंपनी  हायवेच्या चौपदरीकरणाचे काम करत आहे. प्रचंड पाऊस आणि मुंबई-गोवा हायवेचं सुरू असलेलं काम यामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत. मात्र त्याची दुरुस्ती होत नाहीये. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतंय. लोकांनी किती सहन करायचं. अधिकाऱ्यांकडे फंड असताना ते कामं करत नाहीत फक्त पैसे लुटण्याचं काम सुरू असतं असा आरोपही साळवी यांनी केला. कार्यकर्त्यांसह त्यांनी आज सकाळी रस्त्यांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी आपला राग व्यक्त केला.

तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंविषयी नितेश राणे म्हणतात...

नितेश राणेंना जामीन मंजूर

इंजिनिअरला चिखलाने आंघोळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टानं जामीन मंजूर केला. ओरोस न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रवीवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लावावी लागणार आहे.

हे आहे प्रकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते.

मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार हजेरी

या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

First published: July 11, 2019, 3:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading