Home /News /maharashtra /

तारकर्ली बोट दुर्घटनेत शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, बहिणी आणि आई थोडक्यात वाचली

तारकर्ली बोट दुर्घटनेत शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, बहिणी आणि आई थोडक्यात वाचली

आकाश देशमुख हा अकोल्यातील एक हरहुन्नरी युवक होता. शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा सख्खा पुतण्या होता. आकाशाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झालं.

    भारत केसरकर, प्रतिनिधी मालवण, 24 मे :  मालवण  (boat capsized near Malvan) तारकर्ली बोट दुर्घटनेमध्ये (Tarkarli Malvan) मृत झालेला आकाश देशमुख (aakash deshmukh) हा अकोल्याचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (shivsena mla nitish deshmukh) यांचा पुतण्या असल्याचे आता पुढे आले आहे. आकाश देशमुख याचा या बोट दुर्घटनेमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी  मालवणमधील तारकर्ली (Tarkarli Malvan) येथे ही दुर्घटना घडली. या बोटीवर एकूण 20 पर्यटक उपस्थित होते. या बोटीत दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात आकाश देशमुख याचा या बोट दुर्घटनेमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  आकाश देशमुख हा अकोल्यातील एक हरहुन्नरी युवक होता. शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा सख्खा पुतण्या होता. आकाशाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झालं. आपलं शिक्षण बीए आणि यानंतर इंजीनियरिंग झाल्यानंतर आकाश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे छोटे मोठे कंत्राट घेऊन काम करत होता. आकाशाची आई आकाश, त्याची आई, विवाहित बहिण आणि भाऊजी अशी सगळी मंडळी अकोल्यातून पर्यटनासाठी मुंबईला निघाले होते. मुंबईला पोचल्यानंतर मध्ये त्यांचा प्लॅन बदलला आणि ते पर्यटनासाठी थेट मालवणात दाखल झाले. (मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग, एकाच वेळी दोन ठिकाणी खलबतं आणि....) मालवण फिरल्यानंतर आज सकाळी ते तारकर्ली येथे आले आणि त्यांच्या मनात स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा निर्माण झाली. ही सगळी फॅमिली तारकर्ली किनाऱ्यावरून समुद्रात बोटीतून स्कुबा डायव्हिंगसाठी खोल समुद्रात गेली. स्कुबा डायव्हिग आटपून येत असताना वाऱ्याची एक झुळूक आली आणि आलेल्या प्रचंड लाटेत या बोटीने पलटी घेतली. या दुर्घटनेत आकाश देशमुखचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आकाशची आई,  बहिण आणि भाऊजी वाचले आहेत. आपल्या डोळ्यांदेखत झालेल्या आपल्या मुलाचा व भावाच्या मृत्यू हा आई आणि बहिणीला मनाला चटका लावून गेला आहे. सई लोकूरचं नवऱ्यासोबत रोमॅंटिक फोटोशूट; पैठणीचा घागरा अन् जॅकेटनं दिला हटके लुक) या बोटीत 20 पर्यटक बुडाले होते. हे पर्यटनासाठी मालवण मध्ये आले होते. तारकर्लीत बोट बुडून नितीन देशमुख यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. नितीन देशमुख हे शिवसेनेचे अकोल्याचे आमदार आहेत. आकाश देशमुख हा आमदार नितीन देशमुख यांचा राईट हॅन्ड होता. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तो जातीनिशी लक्ष देत होता. आकाशाच्या निधनाने आमदार नितीन देशमुख यांना तीव्र धक्का बसला आहे. नितीन देशमुख यांच्या अकोल्यातील निवासस्थानी घटनेने शोककळा पसरली आहे.  आकाश देशमुख हा अकोल्यातील देशमुख परिवारातील एक हसतमुख चेहरा होता. त्याच्या अकाली निधनाने अकोल्यामध्ये शोककळा पसरली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या