Home /News /maharashtra /

BIG NEWS: शिवसेना आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र झालं रद्द

BIG NEWS: शिवसेना आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र झालं रद्द

Shivsena MLA त्यांनी आमदार म्हणून मिळवलेल्या लाभांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नाशिक 06 नोव्हेंबर: राज्यात शिवसेनेला एकेका आमदाराची गरज असताना धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार लता चंद्रकांत सोनवणे (Shiv Sena MLA lata chandrakant sonawane) यांचं जात प्रमाणपत्र (caste certificate) रद्द झालं आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. सोनवणे यांचं टोकरे कोळी जात प्रमाणपत्र हे समितीने रद्द केलं आहे. लता सोनवणे या जळगांव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र हे चुकीचं असल्याचा समितीच्या सदस्यांनी एकमुखी निर्णय दिला आहे. त्यांनी आमदार म्हणून मिळवलेल्या लाभांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याच बरोबर उपविभागीय अधिकाऱ्यांना 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला होता. हा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. लताबाई चंद्रकांत सोनवणे या 20 हजार 529 इतके मताधिक्‍याने विजयी झाल्या होत्या. विधान परिषदेसाठी सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून खडसे ही निवडणूक अटीतटीची झाली. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून ते बाराव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी आघाडीवर होती. त्यानंतर तेराव्या फेरीपासून सोनवणे यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. सेना व राष्ट्रवादी व बंडखोर अपक्ष यांच्या काट्याच्या लढतीत त्यांनी बाजी मारली होती. मात्र आता या सगळ्या कष्टावर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या