Home /News /maharashtra /

...अन् 25 लाखांचा निधी मिळवा, शिवसेना आमदारानं केलं आवाहन

...अन् 25 लाखांचा निधी मिळवा, शिवसेना आमदारानं केलं आवाहन

'आदर्श गाव-आदर्श संकल्प' समितीचे पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांचा आदर्श घ्या, असंही आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं आहे.

उस्मानाबाद, 19 डिसेंबर: हिवरे बाजार व पाटोदा गावाचा आदर्श घेत ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) बिनविरोध काढा आणि 25 लाख रुपयांचा विकास निधी मिळवा, असं आवाहन शिवसेना आमदार कैलाश पाटील (Shiv Sena MLA Kailas Patil) यांनी केलं आहे. 'आदर्श गाव-आदर्श संकल्प' समितीचे पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांचा आदर्श घ्या, असंही आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे कैलाश पाटील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली की वाद, तंटे टाळाता येतील, म्हणून मतदार संघातील लोकांना आवाहन हेही वाचा...शिवसेनेनं गमावला परळ ब्रँड वाघ... माजी खासदार मोहन रावले यांचं निधन उस्मानाबाद-कळंब या माझ्या मतदार संघात 2021 मध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडतील, अशा गावांना आमदार निधी व इतर निधीतून 25 लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी जाहीर केलं आहे. सण 2020 मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणले की वैयक्तिक हेवे देवे, तंटे या अशा गोष्टी कितीही टाळायच्या म्हणले तरी टाळता येत नाहीत. या हेव्यादेव्यानेच गावाचा विकास खुंटतो. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास तंटे उदभवणार नावणार नाहीत व गावाच्या विकासासाठी चालना मिळेल, असं मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात सदस्य बिनविरोध निवडले जावेत, यासाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपले आयुष्य वेचले आहे. हिवरे बाजार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा या गावांचा आदर्श मतदारसंघातील गावानी घेतला तर नक्कीच एक चांगली सुरवात होईल, असा विश्वास देखील आमदार पाटील यांनी व्यक्त केला. हेही वाचा..सातारा हादरलं! अंडी उधार न दिल्याच्या रागातूनच दुकानदाराची निर्घृण हत्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता कोणाची येते, हा विषय इर्षेचा असतो. परंतु बर्‍याचदा यातील वाद, तंटे हे निवडणुकीनंतरही कायम राहतात. त्याचा परिणाम विरोधाला विरोध करण्याची मानसिकता बळावते. हे सर्व टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. शिवाय कोरोनाच्या काळात गावात एकोपा टिकून राहावा एवढाच उद्देश आहे. यातून ग्रामविकासासाठी चालना मिळावी व सध्याचे कोरोनाचे संकट बळावू नये. याशिवाय गेल्या मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहिलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये. निवडणूक खर्चाची बचत व्हावी, आदी बाबींचा विचार करून माझ्या मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतिची निवडणूक बिनविरोध होईल, त्या ग्रामपंचायतींना आमदार निधी व इतर निधीतून 25 लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याच्यामाध्यमातून गावातील विकासकामे मार्गी लावता येतील. अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध निघाव्यात यासाठी मतदार संघाचा सेवक म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे, असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Shiv sena, Udhav thackarey

पुढील बातम्या