रायगड, 24 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल अपशब्द वापरणे वापरणे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane arrested) यांना चांगलेच महागात पडले आहे. आज सकाळी अटकेपूर्वी 'मी तुम्हाला काय नॉर्मल माणूस वाटलो का?' असं नारायण राणे म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी राणेंची कार जवळून गेली.
आज दुपारी नारायण राणे यांना गोळवली येथून संघाच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ताफा महाडच्या दिशेनं रवाना झाला. त्याचदरम्यान, रस्त्याच्या कडेला उभं राहून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव माध्यमांना प्रतिक्रिया देत होते.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची नारायण राणेंच्या अटकेवर प्रतिक्रिया अन् तितक्यात राणेंनी गाडी गेली... pic.twitter.com/vOINsktEWM
— News18Lokmat (@News18lokmat) August 24, 2021
अटक करायला मी काय नॉर्मल माणूस वाटलो का, असं नारायण राणे म्हणाले होते, यावर पत्रकारांनी भास्कर जाधव यांना विचारला असता, जाधव म्हणाले की, राणे म्हणाले होते की, 'मी नॉर्मल माणूस नाहीये, माझं सुद्धा हेच म्हणणं आहे, ते सामन्य माणूस नाही, त्यांचं डोकं फिरलं आहे, त्यांच्या डोक्यावर उपचार करणे गरजेचं आहे, त्यामुळे ते असं बोलत आहे. त्यामुळे त्यांनी असा गुन्हा केला आहे' असं म्हणत असताना तितक्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर नारायण राणे यांची गाडी आणि पोलिसांचा ताफा समोरून गेला. राणेंनी गाडीतून पाहिलेही अन् भास्कर जाधव यांनी ते राणे होते का? असा सवाल पत्रकारांना विचारला आणि एकच हश्या पिकली.
राणेंचा आजचा मुक्काम पोलीस स्टेशनमध्येच?
दरम्यान, नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज हायकोर्टात याचिका फाईल होणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे आज याचिका दाखल होऊ शकणार नाही. उद्या सकाळी याबद्दल याचिका दाखल होईल. कारण, गुन्हे दाखल केल्याचे ओरीजनल डॉक्युमेंट शिवाय न्यायालयाने याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे.
तसंच, फौजदारी गुन्हे असल्याने राणे यांना उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. दुसरीकडे राणे यांनी आधीपासूनच अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, त्यामुळे त्याची सुनावणी मुंबईत होईल. तर, आता अलिबागचे एसपी आणि IG महाडला आल्यावर एक बैठक होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, High Court